चक्रीवादळ मिचाँगने दिशा
बदलली राज्यातील
या जिल्ह्यात पुन्हा पाऊस ;
नमस्कार आपण बघतो की राज्यांमध्ये मागील 8 दिवसा पासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाका बसला आहे . अनेक शेतकरी बंधूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु काही शेतकरी बंधूना त्यामध्ये फायदा देखील झाला आहे. यावर्षी राज्यामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आणि पाऊसमान कमी झाल्यामुळे राज्यातील रब्बी पिके संकटात असताना पाऊस आणि काही पिकांना दिलासा मिळाला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने चक्रकार वाऱ्यांची स्थिती आणि चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे त्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश उडीसा या राज्यांना अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या भागामध्ये येत्या 5 डिसेंबर पासून मुसळधार ते जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्याचा परिणाम देखील राज्यातील काही भागात जाणवणार आहे.
मिचाँगने या नावाचे चक्रीवादळ
अनेक परिसरामध्ये धुमाकूळ घालणार असून त्यामुळे त्या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे . खालील इमेज मध्ये आपण बघू शकतो की चक्रीवादळामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि उडीसा या राज्यांना पश्चिम बंगाल यांना देखील मुसळधार पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान खाते आणि पंजाब डख सरांनी देखील पुन्हा एकदा राज्यांमध्ये दिनांक पाच डिसेंबर पासून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच इतर इतरत्र भागामध्ये ढगाळ हवामान आणि सकाळच्या वेळेस दाट दुके दव पडण्याची शक्यता आहे .
यावर्षी हिवाळ्यामध्ये ही दुसऱ्या चक्रीवादळ असून राज्यांमध्ये या अगोदर हिवाळ्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस यावर्षी झाला आहे. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात गारपीट आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंची नुकसान झाले आहे त्यातच ही चक्रीवादळ राज्यांमध्ये पुन्हा एकदा परिणाम करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा धडकी भरवणारी बातमी आहे.
अमरावती नागपूर भंडारा नगर धुळे नाशिक या परिसरात ढगाळ हवामान जास्त राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळ येतोय
राज्यात येणार तीव्र थंडीची लाट
नमस्कार राज्यामध्ये मागील आठवड्यात मॅचिंग चक्रीवादळ तसेच अवकाळी पावसाने राज्यातील बऱ्याच या भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकरी बंधूंना पण बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली मॅचिंग चक्रीवादळ त्यामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश चेन्नई या परिसरात अतिशय मुसळधार पाऊस पडला. त्याचा परिणाम राज्यात देखील अनेक भागात जाणवला आहे. या वादळामुळे विदर्भ मराठवाडा या परिसरात मागील आठवड्यामध्ये मुसळधार ती जोरदार पाऊस विशेष करून नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात झाला आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड परभणी बीड या भागात ढगाळ हवामान झाला आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळ येतोय
हिवाळ्यामध्ये राज्यामध्ये अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान आणि अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी बंधूंची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
राज्यातील अवकाळी पावसामध्ये अनेक भागात नाशिक उत्तर महाराष्ट्र खानदेश या परिसरात तसेच विदर्भात काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंची नुकसान झाले आहे.मॅचिंग चक्रीवादळ त्यामुळे आल्यानंतर राज्यातील अनेक थंडीचा कडाका वाढला असताना विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे.
शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट सध्या निर्माण झाले आहे ते म्हणजेच अरबी समुद्रामध्ये एक नव्याने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता ही परंतु त्याचा प्रभाव त्या ठिकाणी भारताच्या दक्षिण विभागावर म्हणजे केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक या परिसरात जाणवणार आहे त्याचा महाराष्ट्रातील दक्षिणेकडे जिल्ह्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे विशेष करून कोल्हापूर सांगली सातारा तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी पंजे या भागामध्ये ढगाळ हवामान ठिकाणी पाऊस येत्या 12 डिसेंबरला पडण्याची शक्यता आहे. खास करून ही चक्रीवादळ ओमान या देशाकडे जाण्याची शक्यता आहे.
राज्यात येणार तीव्र थंडीची लाट
परंतु या चक्रीवादळाचा एक चांगला परिणाम म्हणून राज्यांमध्ये उत्तरेकडून येणारे थंड वारे त्यामुळे राज्यातील तापमानामध्ये पुन्हा एकदा आणखीन घसरण होण्याची देखील शक्यता आहे . त्यामुळे थंडीचा कडाका आहे त्या काळात जाणवणार आहे आणि तीव्र थंडीची लाट देखील राज्यात येणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे ढगाळ हवामान देखील कमी झाले आहे आणि त्याचबरोबर दव धुके दाटले यांचे प्रमाण वाढले आहे .

