पुढील 2 दिवस राज्यात
कोसळणार मुसळधार
अवकाळी पाऊस ;
नमस्कार पुढील दोन दिवस राज्यात कोसळणार अति मुसळधार पाऊस बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे राज्यात आणि भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. मागील आठवड्यात राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना पुन्हा अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाली आहे. त्यामुळे दिनांक 25, 26 व 27 नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गारपिटीचा इशारा;
तसेच पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये ढगांची दाटी केली आहे. नाशिक, नगर, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात गारपीट सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या मुळे रबी हंगामात पिकांना धोका अधिक राहण्याची शक्यता आहे.
दिनाक 24 नोव्हेंबर पासून राज्यात दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात ढगाळ हवामानाचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच पंजाबराव डख यांनी देखिल राज्यात 25 नोव्हेंबर पासून अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे काही पिकांना जीवदान मिळणार असले तरी बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस नुकसानकारक देखील होण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात अनेक भागांमध्ये चड उतार होत आहे. रात्री थंडी तर दिवसा तापमानात वाढ होत आहे. मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गारपिटीच्या काळात कोणती काळजी घ्यावी.
1 गारपिट सुरू झाल्यानंतर शक्यतो घरीच थांबावेत.
2 आपली जनावरे पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी बांधावीत
3 आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे
4 विजा चमकत असताना घरीच थांबावी
IMD rain alert : 25
नोव्हेंबर पासून राज्यात
पुन्हा अवकाळी पाऊस;
नमस्कार राज्यात पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता . बंगालचा उपसागरामध्ये निर्माण झालेली चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुन्हा आता पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आपण बघितले की मागील आठवड्यामध्ये राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती विशेष करून आपण बघितले की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावली. त्यानंतर राज्यामध्ये थंडीचा कडाका अनेक भागांमध्ये जाणवत असतानाच पुन्हा एकदा राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख साहेबांनी व्यक्त केली आहे.
25,26,26 नोव्हेंबर मध्ये राज्यामध्ये विशेष करून अनेक भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही भागांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे . अवकाळी पावसाने जर हजेरी लावली तर राज्यातील रब्बीच्या पिकांना तर जीवदान मिळणारच आहे. तसेच यावर्षी अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये अवकाळी पाऊस विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये साधारणतः 25 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी स्वरुपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनीस वादळी वाऱ्यासह विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिकांना पुन्हा एकदा जीवदान मिळण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणात नुकसानकारक पाऊस देखील होणार आहे .
Rain alert Maharashtra :
भयंकर गारपीट पाऊस
पुढील 2 दिवस
नमस्कार राज्यामध्ये अनेक भागांमध्ये रविवारी या भागात सायंकाळपासून मुसळधार ते जोरदार गारपिटीचा तडाका बसला आहे. मागील अंदाजामध्ये आपण सांगितले होते की यांच्यामध्ये अनेक भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता. दिनाक 25 नोव्हेंबर आहे. संध्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचे गारपीट सदृश्य पाऊस पडत आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस अनेक भागांमध्ये गारपीट सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.
26 27 28 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. बंगालचा उपसागरामध्ये निर्माण झालेली चक्रीवादळ आणि राज्यावर ती निर्माण झालेली कमी दाबाचे क्षेत्र त्यामुळे राज्यांकडे मोठ्या प्रमाणात बाष्प युक्त वारे वाहत आहे.
येत्या 28 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष करून पावसाचा जोर हा उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र ,विदर्भ मराठवाडा या परिसरावर राहण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी व रात्री राज्यातील आणि भागामध्ये विशेष करून उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार इगतपुरी या भागामध्ये तसेच निफाड तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली.
राज्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष करून नाशिक भागातील द्राक्ष पट्ट्यामध्ये तसेच लाल कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच नाशिक मध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे.
पावसाचा जोर आता विदर्भ मराठवाडा या भागामध्ये आज व उद्या गारपीटीची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आली आहे.
विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी झाडाखाली किंवा शेतामध्ये थांबू नये. आणि भागामध्ये गारपीटची शक्यता असल्यामुळे घरीच थांबावी अशी माहिती हवामान खाते विभागाने दिले आहे. भारतीय हवामान खाते आणि पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार तसेच पंजाबराव सरांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांच्या मध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
दुष्काळी भगात शेतकऱ्यांना
मिळणार संजवनी
नमस्कार या वर्षी राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने सरासरी गाठली नसून अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणे देखील भरलेली नाही तसेच अनेक भागात अवकर्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील अनेक पिकांना दुष्काळाचा व पाणीटंचाईचा फटका बसला आहे. तसेच यावर्षी चारा टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने महत्त्वाची पाऊल उचलली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे परंतु हे तालुक्यात त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 40 पेक्षा जास्त तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळ निधी म्हणून राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या घेण्यात आली आहे त्याची घोषणा लवकरच राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब करणार आहे.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल हाती घेतली असून येत्या काळात पाण्याचा देखील काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
तसेच पिक विम्याची रक्कम देखील वाढवण्यात आली आहे. ज्या भागात पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना देखील पिक विम्याची मोठी रक्कम यावर्षी मिळण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्हा 10 तालुक्यात दुष्काळ
सोलापूर 7 तालुक्यात दुष्काळ
सांगली 5 तालुक्यात दुष्काळ
नाशिक 8 तालुक्यात दुष्काळ

